श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे केलेले विविध उपक्रम

देवस्थानातील उपक्रम
 • रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवल्याने जुलै ते सप्टेंबर पर्यंत पाण्याच्या टाक्यात कायम २.५ लाख लिटर पाणी साठवले जाते.
 • निर्माल्यापासून खत, हा प्रकल्प सुरु केल्याने तयार होणारे खत गरजूना दिले जाते.
 • भक्तनिवास १ वर सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसवला आहे. तेथे दिवसाला १० KW  वीज तयार होते. भक्तनिवास १ व २ येथे सोलर वॉटर हीटर बसवले आहेत.
 • दोन्ही मंदिरे व देवस्थानच्या इतर इमारती याना जनरेटरने विद्युत पुरवठ्याची सोय केली आहे.
 • श्रीबल्लाळेश्वर देवस्थानमार्फत नाममात्र शुल्कात वाचनालय चालवले जाते.
यज्ञयाग उपक्रम
 • देवस्थानतर्फे रु. २१,०००/- मध्ये आपण स्वतः गणेशयाग करू शकता. इतरही याग करावयाची व्यवस्था आहे. याबद्दल सविस्तर माहिती देवस्थानच्या कार्यालयात मिळेल.
शैक्षणिक उपक्रम
 • सुधागड़ तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी वह्या वाटप करण्यात येते.
 • दरवर्षी देवस्थानतर्फे तालुक्यातील दहावी, बारावी व महाविद्यालयातील नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात येतो.
सामाजिक उपक्रम
 • देवस्थानतर्फे आदिवासींना दरवर्षी धान्य वाटप करण्यात येते.
 • देवस्थानने मंदिराजवळील झापाळे तलावातील गाळ काढून त्याचे सुशोभीकरण केले आहे.
 • पाली गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित व्हावी, त्यासाठी पाली ग्राम पंचायतीला २०एच.पी. पंप देण्यात आला.
 • पाली ग्राम पंचायतीला कचरा वाहक गाडी दिली आहे. रस्ते दुरुस्त करण्यास निधी दिला जातो.
 • अनेक देवस्थानांना मदत करण्यात येते.
 • आपत्कालीन परिस्थितीत शासनाला मदत करण्यात येते.
वैद्यकिय उपक्रम
 • तालुक्यातील हृदयरोग, कर्करोग इत्यादी गंभीर आजाराने पीडित रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते.
 • नेत्ररोग्यांना शस्त्रक्रियेसाठी मदत केली जात होती, परंतु आता देवस्थानने ‘कौशल्या रामचंद्र रोहरा’ व ‘रोटरी क्लब साऊथ मुंबई’ यांच्या सहकार्याने स्वतःचे नेत्र रुग्णालय बांधले आहे. तेथे हजारो गरजू रुग्ण येत असतात.
 • महिन्यातील प्रत्येक रविवारी आयुर्वेदाचे डॉक्टर मोफत रुग्ण तपासणी करतात.
 • प्रत्येक महिन्याच्या रविवारी, प्रत्येकी दोन विषयातील तज्ञ अ‍ॅलोपॅथी डॉक्टर येऊन रूग्णांची मोफत तपासणी करतात.
स्टोअर
 • देवस्थानचा व्यवहार वाढत असल्याने, एक अद्ययावत स्टोअर करण्यात आले आहे.

देवस्थानचे भावी उपक्रम

 • मंदिर परिसर व इतर इमारतीचा परिसर सुशोभित करणे.
 • मंदिरापासून पांच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या जागेत उद्यान तयार करणे. यात जेष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी व्यवस्था, बसण्यास बाके इत्यादी व्यवस्था राहील.
 • बाहेरून ट्रीपसाठी येणाऱ्या मुलांना शास्त्रीय माहिती व्हावी म्हणून नक्षत्र बाग, पत्री बाग,औषधी वनस्पती झाडे, फुलपाखरू उद्यान, पक्ष्यांची माहिती इत्यादी गोष्टींचा समावेश ह्या उद्यानात करण्यात येणार आहे.
 • श्री बेल्लाळेश्वर मंदिराचा इतिहास व पौराणिक कथेचा “लाईट अँड साऊंड शो” हा उपक्रम भाविकालात करण्यात येणार आहे.
 • देवस्थान जवळ असलेल्या जागेत बहुउद्देशीय सभागृह बांधणे.

माहिती पुस्तीका

श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तीका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली © 2024.सर्व हक्क राखीव | निर्माणकर्ता सेटअपन्यू इन्फोटेक