मंदिराची माहिती

मंदिराची माहिती

नवसाला पावणारा अशी ज्याची ख्याती आहे त्या बल्लाळ विनायकाच्या माहितीची ही वेबसाईट. श्री बल्लाळेश्वराचे महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर किंबहुना देशाविदेशात असंख्य भक्त आहेत. जे गणेश भक्त श्रींची कथा, मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थेच्या कारभाराची पद्धत, संस्थेतर्फे केलेल्या सुधारणा तसेच अभिषेक योजना या विषयी अनभिज्ञ आहेत त्यांना या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून ही वेबसाईट काढण्याचे ठरविले.

हा आमचा एक प्रयत्न आहेज्या मार्फत आम्ही श्री बल्लाळेश्वर देवस्थानासंबधीची माहिती सर्व भाविकांपर्यंत पोहचवू इच्छितो. तूम्हास काही सूचवायचे असेल वा तुमची प्रतिक्रिया कळवायची असेल तर कृपया पुढील पत्त्यावर कळवावी. palidevasthan@gmail.com

श्री बल्लाळेश्वराचे दर्शनाला येणा-या सर्व भाविकांची मनोकामना श्री पूर्ण करोत ही सदिच्छा.

मार्च २०२७ पर्यंत

श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे विश्वस्त

क्र. सभासदाचे नाव पद
श्री जितेंद्र अरविंद गद्रे अध्यक्ष
श्री वैभव मोहन आपटे उपाध्यक्ष
श्री प्रमोद जगन्नाथ पावगी विश्वस्त
श्री अरुण दत्तात्रय गद्रे विश्वस्त
श्री विश्वास विद्याधर गद्रे विश्वस्त
श्री अमोल अशोक साठे विश्वस्त
डॉ. श्री पिनाकिन सदानंद कुंटे विश्वस्त

श्री चंद्रशेखर वैजनाथ सोमण, व्यवस्थापक
देवस्थान संपर्क पत्ता –
श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली,
ता. सुधागड, जिल्हा  रायगड  ( महाराष्ट्र)

पीन कोड – ४१०२०५

दूरभाष क्रमांक – ०२१४२-२४२२६३

श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तीका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली © 2024.सर्व हक्क राखीव | निर्माणकर्ता सेटअपन्यू इन्फोटेक