भाविकांसाठी निवास व्यवस्था

भक्तनिवास १

  • पहिला मजला
    १) शौचालय आणि स्नानगृह न जोडलेल्या पाच खोल्या,
    शौचालय आणि स्नानगृह जोडलेल्या पाच खोल्या – या प्रत्येक खोलीत पाच व्यक्ती राहू शकतात.
    २) ४ बेड असलेल्या जोडलेल्या व्ही आय पी . खोल्या – एकूण २ खोल्या.
  • दुसरा मजला
    १) चार मोठ्या खोल्या. प्रत्येक खोलीत अंदाजे ३० व्यक्तिंची सोय होते.
    २) लहान पाच खोल्या. प्रत्येक खोलीत अंदाजे ५ ते ७ व्यक्तिंची सोय होते.

  • तळमजला
    तळमजल्यावरील हॉल व शेड राहण्यास देण्यात येतात.
    अंदाजे १०० ते १२५ व्यक्तिंची सोय होते.तळमजला व दुसरा मजला येथे रहाणार्‍यांना देवस्थानतर्फे फक्त सतरंजी दिली जाते.

भक्तनिवास २

  • पहिला व दुसरा मजला
    शौचालय आणि स्नानगृह जोडलेल्या १४ खोल्या असून त्यापैकी ७ खोल्या वातानुकुलीत आहेत.
    एका खोलीत जास्तीत जास्त ३ व्यक्ती राहू शकतात.
  • तळमजला
    तळमजल्यावरील हॉलमध्ये अंदाजे ६० व्यक्तिंची सोय होऊ शकते.
    देवस्थानतर्फे फक्त सतरंजी देण्यात येते.

अतिशय महत्वाच्या सूचना

१) फोनवरून खोल्यांचे आरक्षण केले जात नाही.

२) निवासात राहण्यास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे त्याचे स्वतःचे फोटो ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

३) दोन्ही भक्त निवासात सकाळी ५ ते ७ या वेळात गरम पाण्याची सोय केलेली आहे.

४) भाविकांना जास्तीत जास्त तीन दिवस भक्त निवासात राहता येईल.

श्री चंद्रशेखर वैजनाथ सोमण, व्यवस्थापक
देवस्थान संपर्क पत्ता –

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली,
ता. सुधागड, जिल्हा  रायगड  (महाराष्ट्र)

पीन कोड – ४१०२०५

दूरभाष क्रमांक – ०२१४२-२४२२६३

श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तीका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली © 2024.सर्व हक्क राखीव | निर्माणकर्ता सेटअपन्यू इन्फोटेक