पाली परिसरातील काही रम्य स्थळे

पाली परिसरातील काही रम्य स्थळे

  • पाली परिसरातून दिसणारा सरसगड हा शिवाजीकालीन टेहाळणीचा किल्ला आहे. किल्ल्यावर टेहाळणीचे बुरुज व प्राचीन शिवमंदिर पाहता येते.
  • पाली शहरात, मल्लिकार्जुन, हटाळेश्वर ,केदारेश्वर ही  पुराणकालीन शिव मंदिरे, पूर्वाभिमुख मारुतीमंदिर, दत्त मंदिर, श्रीराम मंदिर, अंबामाता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, महाकाली मंदिर, मरीमाता मंदिर  ही अन्य मंदिरे आहेत.
  • पालीपासून ३ कि मी अंतरावर सिध्देश्वर येथे ३५० वर्षापूर्वीचे पाषाणी स्वयंभू शंकराचे स्थान आहे येथे (कार्तिक शु. पौर्णिमा ) त्रिपुरादि पौर्णिमेला मोठा उत्सव साजरा केला जातो. सिद्धेश्वरजवळ पुईयेथे ‘एकवीस गणपतीचे’ सुंदर  मंदिर पहावयास मिळते.
  • पाली पासून ४ कि मी अंतरावर भूगर्भातून भूपृष्ठावर वाहणारे गंधयुक्त गरम पाण्याचे झरेउन्हेरे येथे पहावयास मिळतात. येथून जवळच केशवनगर येथे ‘श्रीरुद्रेश्वर शिवमंदिर’ आहे.  येथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो.
  • श्री रामास ज्या ठिकाणी देवीपासून आशिर्वाद प्राप्त झाला ते ठिकाण ‘उसर’ येथे आहे, त्या देवीस ‘वरदायिनी’ असे संबोधतात हे निसर्गरम्य स्थान पालीपासून ९ कि.मी अंतरावर आहे. ही पालीची ग्रामदेवता आहे. येथे नवरात्रात १० दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो.
  • रावणाने जटायूशी युद्ध करून ज्या ठिकाणी जटायूचे पंख छाटले व श्रीरामांनी जटायूचा उद्धार केला ते ‘उद्धर’स्थानं व तेथून वर रामेश्वर येथे श्री शंकराचे स्वयंभु स्थानं पाली येथून १४ कि.मी अंतरावर आहे. ‘उद्धर’ येथे अस्थिविसर्जनाचे कुंडं आहे. येथे अस्थी पाण्यात विरघळतात. येथूनजवळ ‘रामेश्वर वैभव’ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
  • भोर संस्थानिकांची कुलदेवता  श्री भोराई देवी १५ कि.मी. अंतरावर आहे. देवीची स्थापना श्री भृगुऋषींनी केली आहे. नावरात्रामध्ये १० दिवस गडावर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. देवीचे स्थान जागृत आहे, हया किल्याला ‘सुधागड’ असे म्हणतात.
  • गोमाशी येथील डोंगरात श्री भृगुऋषीं स्थान असून नाडसूर जवळच ‘ठाणाळे’ येथे सुंदर रंगीत कोरीव लेणी आहेत.
  • पालीपासून अंदाजे १७ कि .मी. अंतरावर आसरा नवघर येथे श्री विरेश्वराचे स्वयंभू स्थान आहे.
  • पालीपासून अंदाजे १५ कि .मी. अंतरावर जांभुळपाडा येथे गणेशाचे मंदिर आहे.
  • पाली खोपोली रस्त्यांवर पालीपासून अंदाजे २५ कि .मी. अंतरावर ‘इमॅजिका ’अम्युझमेंट पार्क ‘ झालेले आहे.

श्री चंद्रशेखर वैजनाथ सोमण, व्यवस्थापक
देवस्थान संपर्क पत्ता –

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली,
ता. सुधागड, जिल्हा  रायगड  (महाराष्ट्र)

पीन कोड – ४१०२०५

दूरभाष क्रमांक – ०२१४२-२४२२६३

श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तीका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली © 2024.सर्व हक्क राखीव | निर्माणकर्ता सेटअपन्यू इन्फोटेक